ताजी बातमी

लोकसभा निवडणूक -2019


वृत्त विशेष – 38

मुंबई शहर जिल्हा - निवडणूक माध्यम कक्ष मुंबई, दि.18: मुंबई शहर जिल्हयात सायन भागात काल रात्री निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाव्दारे 11 लाख 85 हजार संशयीत रक्कम पकडली. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

    याबाबतची अधिक माहिती अशी, दि. 17 एप्रिल 2019 रोजी बुधवार रात्री सुमारास सायन कोळीवाडा परिसरात विधानसभा मतदारसंघातील संजय नारायन वारंग यांच्या क्र.3 या फिरत्या तपासणी पथकाने सायन हॉस्पीटल जवळील सिग्नलवर पाहणी करीत असताना, त्यांनी लाल रंगाच्या रेनॉल्ट डस्टर या मोटार कारची (एम.एच.47 ए.बी.6559) तपासणी केली.  गाडीमध्ये दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह व अनुराग कुमार शाह हे तीन इसम होते. त्याच्याकडे 11 लाख 85 हजार रुपये रक्कम आढळून आली. 

याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असुन आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत. अशी माहिती 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात