ताजी बातमी

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुलझडी, अनार यासारखे मर्यादित स्वरूपात फटाके फोडण्यास राज्य शासन व महापालिका प्रशासनाने  परवानगी दिली असून कोरोनाचे संकट लक्षात घेता,मुंबईकर नागरिकांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

 आगामी "दिपावली"  सणाच्या तयारी अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख रुग्णालये व अग्निशमन दलाने केलेल्या तयारी कामांचा  महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दि.०९  नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी भायखळा येथील पेग्विंन कक्षात आयोजित बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महापौर बोलत होत्या.  

    याप्रसंगी उप महापौर ॲड. सुहास वाडकर,सह आयुक्त (विशेष)  श्री.  आनंद वाघराळकर, उपायुक्‍त (पर्यावरण)

श्री. अशोक यमगर, संचालक (प्रमुख रुग्णालये) डॉ.रमेश भारमल, प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री.शशिकांत काळे,  विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता तसेच परवाना  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

      महापौर किशोरी पेडणेकर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मुंबईकरांच्या काळजीपोटी प्रमुख रुग्णालयातील भाजलेले वॉर्ड सुसज्ज ठेवावे, जेणेकरून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपचार करता येणे शक्य होईल. दिपावलीच्या काळामध्ये ध्वनी व वायू प्रदूषणामुळे कोरोना संक्रमितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे मोठ्या आवाजाचे फटाके  फोडण्यासाठी बंदी घालण्यात आली  असल्याचे महापौरांनी सांगितले.

 २५ ऑक्टोंबर २०१६ च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आवाजाचे व हवेत उडणारे फटाक्यांवर बंदी घालण्यात आली  असल्याचे महापौरांनी सांगितले. रहिवाशी क्षेत्रातील फटाके दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत असेल तर त्यांच्या दुकानांची तपासणी करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी  परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 


भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळतांना दृकश्राव्य प्रणालीद्वारे ओवाळणी करावी असे आवाहनही महापौरांनी यानिमित्ताने केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात