ताजी बातमी

*वांद्रे पोलीस ठाणे*  गु.र.क्र. 672/20 कलम 307, 397, 394, 34 भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद.

 *गुन्हा दाखल* दिनांक-३१.१०.२०२०

 *अटक आरोपी नामे-* 

१) आफताब आजम खान उर्फ मंगलेश, वय 19 वर्ष

२) काशिफ हुसेन माहीमी उर्फ गब्बर,वय 19 वर्ष

यांना अटक करण्यात आली आहे.


 *पाहिजे आरोपी नामे* - पिर मोहम्मद इम्तियाज शेख ,वय 19 वर्ष


 *गुन्ह्याची थोडक्यात हकिकत* अशी की:- नमूद गुन्ह्यातील फिर्यादी हे पाली माला रोड वांद्रे पश्चिम मुंबई येथे सकाळी मॉर्निंग वॉक करीत असताना मोटरसायकल क्रमांक 88 97 वरून आलेल्या तीन अनोळखी इसम यांनी फिर्यादी यांच्या डोक्यामध्ये चाकुने गंभीर दुखापत करून तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांचे गळ्यातील दोन चैनी,मोबाईल व हातातील घड्याळ किंमत अंदाजे रुपये 1,85,000/- मालमत्तेची जबरीने चोरी केली. तसेच  सदर इसमा॑नीच ॲ‌न्डयुज कॉलेज च्या समोरील रोडवर श्री मार्क कॉर्देरो यांना सुद्धा त्यांचे डोक्यामध्ये धारदार चाकूने दुखापत करून  जबरीने त्यांच्यामोबाइल व रोख रक्कम एकूण किंमत अंदाजे रुपये 28,500/- मालमत्तेची चोरी केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला होता.


 *तपास* - नमूद गुन्ह्यांमधील फिर्यादी यांनी सांगितलेला मोटारसायकल क्रमांक 8897 च्या आधारे 350 ते 380 मोटरसायकल क्रमांक ची तपासणी करून नमूद गुन्ह्यांमध्ये वापरलेली मोटरसायकल क्रमांक MH 02 FK 8897 ही निष्पन्न झाली.तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने व गुप्त बातमी दाराकडून खबर प्राप्त करून नमूद आरोपीत यांची नावं निष्पन्न करण्यात आली.मोबाईलचे सी डी आर आर च्या माध्यमातून तांत्रिक तपास करून सदर आरोपीत हे गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून दादर परिसरांमध्ये वावर करत असल्याचे समजले. त्यानंतर दादर रेल्वे स्थानकाबाहेरील सर्व हॉटेल व लॉजची तपासले असता वरील आरोपी हे एका लॉजमध्ये वास्तव्यास असल्याबाबत आढळले. त्यांना शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले तसेच तपासादरम्यान त्यांचा नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा फरार असल्याबाबत समजले व त्याचा शोध घेत आहोत.

सदर आरोपी त्यांनी वांद्रे पोलीस ठाणे तसेच बृहन्मुंबई परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केल्याबाबत प्राथमिक तपासामध्ये दिसून येत असून त्यासंदर्भात अधिक पुढील तपास करत आहोत.

सदरचा गुन्हा हा तांत्रिक कौशल्याचा वापर करून व अथक परिश्रम घेऊन मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 9, मा.सपोआ वांद्रे विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निखील कापसे, पोलीस निरीक्षक कुंभार वांद्रे पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली वांद्रे पोलीस ठाण्याचे खालील नमूद पथकाने 12 तासाच्या आत मध्ये उघडकीस आणलेला आहे.

 *गुन्हे प्रकटीकरण अधिकारी* सपोनि हेमंत फड व पो उप नि आनंदराव काशीद

पोह क्र.30221/कदम, पोह क्र 970604,  पोना क्र 01.270/ताडगे, पोना क्र 03.213/बरगे, पोना क्र 05.858/राठोड, पोशि क्र 04.530/निकम, पोशि क्र 09.3277/बनसोडे, पोशि क्र 11.1479

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात