ताजी बातमी

मुंबई:  शतकाच्या जुन्या मसिना हॉस्पिटल चा उपक्रम असलेल्या मसिना हार्ट इन्स्टिट्यूटने अलीकडेच फिलिप्सचे  प्री-फॅब्रिक्टेड ट्रान्स्पोर्टेबल आयसीयू स्थापित केले आहे, सदर कार्यक्रमाचे/ भागाचे उदघाटन श्री यशवंत जाधव--अध्यक्ष स्थायी समिती--बीएमसी, श्रीमती यामिनी जाधव, आमदार भायखळा आणि श्रीमती सोनम मनोज जामसुटकर, नगरसेवक यांनी केलेइस्पितळ सर्वाना परवडणारी चिकित्सा सेवा देण्यासाठी ओळखल्या जाते. हे अ‍ॅडव्हान्स कार्डियाक केअर युनिट (एसीसीयू) कॉव्हिड सुरक्षित वातावरणात, ह्रदयरोग असलेल्या रूग्णांवर उपचार करण्याच्या उद्देशाने वापरले जाईल. या एसीसीयूमुळे, रुग्णालयात रूग्णांवर पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने संसर्ग होऊ न देता हृदयविकाराचा उपचार करता येईल .

मसिना हार्ट इन्स्टिट्यूटने काल मुंबईत आपले विशेष प्रगत असे कार्डियक केअर युनिट सुरू केले. हे एसीसीयू मोकळ्या जागेत स्थापित केले गेले आहे,  ज्यामध्ये स्वतंत्र क्यूबिकल्स आहेत ज्यामध्ये  ताजी हवा , एचव्हीएसी सिस्टम आणि स्वत: जंतुनाशक करणारे स्वच्छता गृह ई. सुविधा दिलेल्या आहेत, जेणे करून  हृदयरूग्णांना संसर्ग होण्याची शक्यता बऱ्याच अंशी टाळता येईल.  आयसीयूसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा देताना हे एसीसीयू रुग्णांना कोविड आणि अनेक संसर्ग  होण्यापासून संरक्षण देण्याच्या दृष्टीने तयार केले गेलेले आहे.  डॉ. जैनुलाबेडिन हॅमदुलये यांच्या अध्यक्षतेखाली वैद्कीय सल्लागार, अति दक्षता चिकित्सक  आणि नर्सिंग कर्मचारी रुग्णांवर   उपचार करतील.

उद्घाटनप्रसंगी मसिना हार्ट इन्स्टिट्यूटचे कार्डिओथोरॅसिक सर्जन अँड चेअरमन डॉ. जैनुलाबेदीन हमदुले म्हणाले, “कोविडने एक अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे,  ज्यामुळे कोवीड नसलेले हृदय रुग्ण, संसर्गा च्या भीतीमुळे उपचारासाठी रूग्णालयात जाण्यास तयार नाहीत. त्यांच्या उपचारामध्ये थोडा विलंब झाल्यास दुर्दैवी परिणाम होऊ शकतात आणि ह्याच गोष्टी लक्षात घेता आम्ही फिलिप्सकडून हृदयरोग्यांच्या सुरक्षित उपचारांसाठी विशेष आयसीयू युनिट घेण्याचे ठरविले. हे युनिट मुख्य रुग्णालयाशी थेट संपर्क न ठेवता ही रुग्णांना संसर्गा पासून दूर ठेवून अतिदक्षता पुरवण्यास सक्षम करेल. ”   

“या एसीसीयू अंतर्गत आमच्याकडे 9 स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र बॅक्टेरिया विरोधी, स्वतंत्र एचव्हीएसी (हीटिंग, वेंटिलेशन आणि एयर कंडिशनिंग ) प्रणाली जे एएसएचआरएई (अमेरिकन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग आणि एयर कंडिशनिंग इंजिनिअर) ने मंजूर केलेले, अति दक्षता आणि देखरेखीसाठी असलेले क्यूबिकल्स आहेत. हे युनिट स्वतंत्र हाय-एंड मेडिकल गॅस एअर कॉम्प्रेशर्स, व्हॅक्यूम पंप, ऑक्सिजन मॅनिफोल्ड, व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर, नर्सिंग स्टेशन आणि स्टोरेज एरिया ने सुसज्जित आहेत. कोविड पॉझिटिव्ह असलेले पण फुफ्फुसाचे आणि हृदय रोग असलेल्या रुग्णांसाठी, या युनिट अंतर्गत सर्व आवश्यक तीव्र ईसीएमओ सेवा पुरविल्या जातील. तीव्र हृदयविकाराचा झटका आलेल्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णालाही इतर रुग्णांवर परिणाम होऊ  न देता आपत्कालीन उपचार देता येईल”.  असे ही ते पुढे म्हणाले. 

याप्रसंगी बोलताना स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, बीएमसी, म्हणाले की," डॉ झैनूलाबेदीन हमदुलई यांचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे। मेसीना हार्ट इन्स्टिट्यूट फिलिप्सचे युनिट यांनी एक रुग्णांसाठी संसर्गापासून सुरक्षित असे ऍडव्हान्स कार्डीयाक केयर युनिट सुरू केले. त्यांच्या या उपक्रमाने शहरातील आणि इतर राज्यातील रुग्णांना खूप मदत होईल आणि भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा हे महत्वाचे पाऊल असेल"

या महामारी  दरम्यान रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त  असल्याने , सुरक्षित आणि संपूर्ण अति दक्षता  देण्यासाठी मसिना हार्ट इन्स्टिट्यूट आवश्यक ती पावले उचलत आहे.  फिलिप्सने डिझाइन केलीली  अत्याधुनिक अशी ही संकल्पनात्मक युनिट देशात प्रथमच स्थापित केली गेली आहे. 

इन्स्टिट्यूट मधील अ‍ॅडव्हान्स कार्डियाक केअर युनिट या महामारी  दरम्यान तीव्र ह्रदयाचा आजार असलेल्या  रूग्णांसाठी एक जीवनरक्षक म्हणून सिद्ध होईल.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात