ताजी बातमी

मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात भीम आर्मी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश च्या सचिव वर्षाताई मस्के कांबळे यांनी त्यांच्या राज्य भरातील शेकडो महिला कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला. आज बांद्रा येथील संविधान निवासस्थानी वर्षाताई मस्के कांबळे यांनी ना रामदास आठवले यांची भेट घेऊन रिपाइं मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव; अंकुश हिवाळे;आशाताई मोरे; सुनंदा मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.


वर्षाताई मस्के कांबळे या भीम आर्मी या संघटनेत राज्य सचिव पदावर काम करीत होत्या. आक्रमक आणि अभ्यासू तरुण महिला  नेतृत्व म्हणून त्या लोकप्रिय आहेत. त्यांचे मुंबई;ठाणे; बीड;  अहमदनगर ;औरंगाबाद येथे स्वतःचे संघटन आणि समर्थक आहेत. त्या मृण्मयी फाउंडेशन च्या अध्यक्षा असून या फाउंडेशन द्वारे औरंगाबाद येथे इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू आहे.  मुंबईत अनेक ठिकाणी त्या सामाजिक उपक्रम राबवित असतात. मुंबईत अनेक झुंझार महिलांचे संघटन त्यांच्या सोबत आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या झुंझार लढाऊ नेत्या म्हणून वर्षाताई मस्के कांबळे यांचा राजकीय अनुभव पाहता त्यांची रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या  महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात येणार असल्याचा आदेश  ना रामदास आठवले यांनी रिपाइं महिला आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ऍड. आशाताई लांडगे यांना दिला आहे.अशी माहिती रिपाइं चे  जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव यांनी दिली आहे. वर्षाताई मस्के कांबळे यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला बद्दल रिपाइं च्या वतीने अनेक मान्यवरांनी वर्षाताई मस्के कांबळे यांचे रिपाइं मध्ये स्वागत केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात