ताजी बातमी

जामखेडला तर कंटेंनमेंट झोन जाहीर करण्यात आलं होतं, पण प्रशासनाने योग्य नियोजन करुन जामखेड कोरोनामुक्त केलंच शिवाय, कोरोना मुक्तीचा जामखेड पॅटर्न यानिमित्ताने उदयाला आला. याचं संपूर्ण श्रेय हे तिथल्या प्रशासनाला व लोकांच्या सहकार्याला जातं. या दरम्यान, लोकांना अन्नधान्य, भाजीपाला, दूध या कशाचीही कमतरता पडणार नाही, याची दक्षता घेतली. रेशनकार्ड असलेले, नसलेले आणि गरजू यापैकी कोणीही उपाशीपोटी राहणार नाही यासाठी गहू, तांदूळ, तेल, कांदे-बटाटे, डाळी, किराणा माल हे सर्व साहित्य पुरवलं. यामध्ये स्वतः एकही फोटो काढला नाही, किंबहुना फोटो काढणं नाही तर लोकांच्या पोटाची सोय होणं महत्त्वाचं होतं. म्हणून दिखावा व राजकारण जाणीवपूर्वक दूर ठेवत हे सर्व साहित्य प्रशासनाच्या ताब्यात देऊन कोणताही भेदभाव न करता त्याचं लोकांना वाटप करण्यास सांगितलं. म्हणून तर जामखेड कोरोनामुक्त करण्यात यश आलं, असं मी म्हणेन.


कोरोनामुक्त मतदारसंघ केल्यानंतर बाहेरून होणारा कोरोनाचा संसर्ग रोखणं हे आमच्यापुढं एक आव्हान होतं. कारण लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे पुणे-मुंबई सारख्या कंटेंनमेंट भागातून अनेक लोक गावाकडे येत होते. आतापर्यंत त्यांना आपापल्या गावातील शाळेत क्वारंटाईन केलं जात होतं. पण तिथे लाईट, स्वच्छता, जेवण, टॉयलेट अशा तक्रारी काही ठिकाणांवरून आल्या. त्यामुळे लोक स्वतःहून क्वारंटाईन न होता गपचूप घरी निघून जात. यामुळे त्यांच्या कुटुंबाला व इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होता. ही बाब लक्षात घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात मध्यवर्ती क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिथं स्वतंत्र टॉयलेट, जेवणाची सुविधा पुरवण्यात येतेय. हा एक पहिलाच प्रयोग आहे, पण तिथं क्वारंटाईन केलेल्या लोकांसाठी सर्व सुविधा पुरवत आहोत. याचा तिहेरी फायदा होणार आहे. सेवा हा सर्वांत मोठा धर्म असतो. त्यामुळे यानिमित्ताने लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल, दुसरं म्हणजे कर्जत-जामखेड मतदारसंघात कोरोनाला प्रतिबंध घालण्यास मदत होईल आणि तिसरा फायदा म्हणजे प्रशासनाला नियोजन करणंही सोयीचं होईल.


प्रांताधिकारी, तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांसोबत या सर्व ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात