ताजी बातमी

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि माल वाहतुकीतील समस्या जाणून घेत राज्य परिवहन महामंडळाला एसटी बसेस मार्फत  माल वाहतूकीची परवानगी  देण्यात आली आहे. रा. प. महामंडळाच्या माध्यमातून  ही वाहतूक सेवा सुरु करण्यात येत आहे. 


निर्णयाची अंमलबजावणी म्हणून कोकणातील १५० पेटी हापूस आंबे घेऊन ट्रक बोरिवलीच्या दिशेने रवाना करण्यात आला आहे. लवकरच कोकणचा हापूस, मुंबई-पुण्याच्या ग्राहकांना सहज उपलब्ध होईल.


गेली ७२ वर्षे अविरत सेवा पुरविणाऱ्या एसटी कडे २५० आगार व ६०१ बसस्थानकात सुमारे  १८५००  बस आणि ३०० ट्रक असा सुसज्ज ताफा असून विहित आयुर्मान पूर्ण केलेल्या प्रवासी वाहनांमध्ये अंतर्गत बदल करून ९ मेट्रिक टन वजनापर्यंतच्या मालाची वाहतूक केली जाणार आहे.


मालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या बुकिंगची व्यवस्था महामंडळाच्या प्रत्येक आगारात व बस स्थानकावर उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासाठीची कार्यप्रणाली लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या तसेच इतर मालाच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला असल्याने अतिशय माफक दरात मालवाहतूक करण्याचा निर्णय रा. प. महामंडळाने घेतला आहे.

मालवाहतुकीची कार्यप्रणाली तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या महामंडळाच्या विभागीय कार्यालयात नोडल ऑफिसर ची नेमणूक करण्यात आली आहे.

 मी असे आवाहन करतो की शेतकरी, व्यापारी, उद्योजकांचे हित साधत सदर निर्णय घेण्यात आला असून संबंधितांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात