ताजी बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेनं विकसित केलेल्या पुणे स्मार्ट सिटी वाॕर रूमला (डॅश बोर्ड) भेट दिली. याठिकाणी अत्याधुनिक संगणकीय प्रणालीची कार्यपद्धती जाणून घेऊन काही उपयुक्त सूचना केल्या. ही प्रणाली उत्तम असून शहरातील कोरोनाबाधित क्षेत्र, रुग्ण, वाढत्या परिसराची अद्ययावत माहिती इथं उपलब्ध होते. त्यामुळे उपाययोजना करणं सोपं जातं.

अगदी सुरूवातीपासूनची माहिती याठिकाणी आपण पाहू शकतो. भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडीप्रमाणे अन्य जागी कोव्हिड सेंटर कार्यान्वित केले पाहिजे. कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. यावेळी डॉक्टर, रुग्णवाहिका संख्या व त्यांच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला. यासोबतच निधीची आवश्यकता भासल्यास तशी मागणी करा. तत्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात