ताजी बातमी

राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी गोरेगांव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र २ (CCC 2) व्यवस्थेची आज (दिनांक २० मे २०२०) पाहणी केली.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल यांनी पालकमंत्री श्री. ठाकरे यांना सदर केंद्राबाबत सविस्तर तपशील दिला. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी तयारीबाबत समाधान व्यक्त केले. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठिकठिकाणी उभारण्यात येत असलेल्या समर्पित कोरोना केंद्रांची नियमितपणे पाहणी करुन पालकमंत्री श्री. ठाकरे हे प्रशासनाला आवश्यक ते निर्देश देत आहेत. याचाच एक भाग म्हणून ही भेट दिली. 

एकूण १,२४० बेड क्षमता असलेल्या नेस्को कोरोना काळजी केंद्रामध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिले जाणार आहेत. पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. या केंद्राची आवश्यकतेनुसार क्षमतावाढ देखील करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  या

पाहणीप्रसंगी सहआयुक्त (दक्षता) श्री. आशुतोष सलील, सहआयुक्त (विशेष) श्री. आनंद वागराळकर, पी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. देवीदास क्षीरसागर, विशेष कार्य अधिकारी श्री. देवेंद्र जैन आदी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात