ताजी बातमी

ऑनलाईन 9 व्या राज्यस्तरीय इ  कराटे डो चॅम्पियन्स शिप  2020

कराटे चा सराव सक्रिय ठेवण्यासाठी शोतोकान कराटे युथ असोसिएशन ने राज्यस्तरीय ऑनलाईन इ काता कराटे  चॅम्पियन शिप स्पर्धा रविवार दि. 03 मे 2020 रोजी आयोजित केली होती.

        या स्पर्धेत मुंबई, मुंबई उपनगर, चेंबूर, आणि पनवेल या ठिकान्या वरून 150 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धकांनी आपल्या घरी राहून काता चा व्हिडिओ असोसिएशन ला पाठविला. त्यामुळे या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी पंचांनी घरी राहून झूम  एप् द्वारे सदर स्पर्धेचा निकाल दिला.

      या स्पर्धेत रायगड पनवेल मधून  कुमारी समिक्षा दिपक कायंदेकर हिला सुवर्णपदक मिळाले. तसेच तिचा भाऊ कुमार वेदांत दिपक कायंदेकर याला रजत पदक प्राप्त झाले.

          तसेच मुंबई उपनगरात राहणारे कुमार  वेदांत घाडी आणि मयुरेश चोडणकर या दोघांना सुवर्णपदक मिळाले. या सर्व विजेत्या स्पर्धकांचे असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजू मोरे सर यांनी कौतुक केले.

             समिक्षा आणि वेदांत ला  श्री राजू मोरे सर आणि श्री मंदार पणवेलकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात