ताजी बातमी

कोरोनाची लागन झाल्याने मुंबई पोलीस दलाने 3 वीर पोलीस गमावल्यानंतर पुणे पोलीस दलात कोरोनाने पहिला बळी घेतला. वीर मरण आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे वय 57 वर्ष आहे. सोपउनिवर पुण्यातील भारती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान 4 मे रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गेल्या दीड महिन्यापासून कोरोना संकटात कर्तव्य बजावत होते. कर्तव्यावर असताना सपोउनि अनेक गरजूंना मदत करत होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच पुणे पोलीस दलासह राज्य पोलीस दलात शोककळा पसरली. अनेक नेटकऱ्यांनी वीर मरण आलेल्या सपोउनि यांना श्रद्धांजली अर्पण करताना गरजूंना मदत करताना टिपलेले क्षण सोशल मीडियावर वायरल केले. 

     सर्वच स्थरातून वीर मरण आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आतापर्यंत मुंबईचे 3 तर पुण्याचा 1 असे एकूण 4 पोलीस कोरोनाची बाधा होऊन पोलीस दलाने गमावले आहेत. राज्य पोलीस दलात कर्तव्य बजावताना अनेक पोलिसांना कोरोनाची लागन झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापुढे एकाही पोलिसाचा बळी जाता कामा नये. यासाठी पोलीस बंधू / भगिणींनो कर्तव्य बजावताना जमेल तेवढी काळजी घ्या. 

     "सतर्क पोलीस टाईम्स" परिवाकडून वील मरण आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात