ताजी बातमी

उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदन 

पुण्यातील कोरोना बाधित दाम्पत्याचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने व ते या संसर्गातून बरे झाल्याने त्यांना आज नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी ही चांगली बातमी आल्यामुळे कोरोना बरा होऊ शकतो असा संदेश नागरिकांमध्ये जाण्यास मदत झाली आहे. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अभिनंदन केले आहे. यापूर्वी काल मुंबई आणि औरंगाबाद येथील बरे झालेल्या रुग्णांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज राज्यात दिवसभरात १५ नवीन रुग्ण  आढळून आले आहेत. एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२२ झाली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात