ताजी बातमी

मुंबई गुन्हे प्रकटीकरण युनिट 9 च्या पथकाने बेकायदेशीररीत्या मास्कचा साठा जप्त केल्याची घटना ताजी असताना अंधेरी पूर्व परिसरातील सहारगाव येथे 1 कोटी रुपयांचे 200 मास्कचे बॉक्स जप्त करण्यात आले. या बॉक्समध्ये तब्बल 4 लाख मास्क आढळून आले. ही उत्तम कारवाई विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक(गुन्हे) राजेंद्र काणे यांना मिळालेल्या माहितीनुसार विलेपार्ले व सहार पोलीस पथकाने संयुक्तरीत्या केली अशी माहिती परिमंडळ 8 चे उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली. या कारवाईवरून कर्तव्याला हद्द नसते हे स्पष्ट झाले.

     मास्क, बोगस सॅनिटायझरच्या काळाबाजारावर लक्ष ठेवून असताना विलेपार्ले पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांना बेकायदेशीररीत्या मास्कचा साठा केल्याची माहिती खबऱ्याने दिली. क्षणाचा विलंब न लावता हद्दीबाहेर अर्थात सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोनि काणे व सपोनि शिव भोसले व पोलीस पथकाने धाड टाकली. अंधेरी पूर्व परिसरातील सहारगाव, कार्गो सर्व्हिस मार्गावरील शहा वेअर हॉसिंग व ट्रान्सपोर्ट गोदामातून मास्कने भरलेले 200 बॉक्स जप्त केले. 

     या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3, 7 नुसार गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात