ताजी बातमी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लागू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मदतीला आता एसटीची लालपरी आणि बेस्ट बसेस तैनात करण्याचे निर्देश


एसटीने मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली व कल्याण (सकाळी ८:००,८:१५) येथून तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील नालासोपारा व विरार (सकाळी ७:००,७:१५) येथून थेट मंत्रालयासाठी बसेसची सोय केली आहे.


 बेस्ट बसेस-

बोरिवली स्टेशन-मंत्रालय (८:००,८:३०),

शासकीय वसाहत बांद्रा-मंत्रालय(८:३०,९:००) 

 पनवेल स्टँड-मंत्रालय (७:३०,८:३०)

ठाणे कॅडबरी जंक्शन-मंत्रालय (८:००,८:३०)

 डॉ.आंबेडकर उद्यान चेंबूर-मंत्रालय(८:३०,९:००) 

 विक्रोळी डेपो-मंत्रालय(८:३०,९:००)

 खुराणा चौक वरळी-मंत्रालय(८:४५,९:००)


याबरोबरच बृहन्मुंबई महापालिका ,शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, औषध दुकानदार,पोलीस, विविध बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी आदी केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने-आण करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावरून बसेसची सोय


पनवेल,पालघर,आसनगाव,विरार कल्याण , बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली,वाशी दादर व ठाणे (खोपट)या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत एसटी बसेस.

 तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होईल.

 एसटीच्या बसेस दर ५ मिनिटांला या प्रमाणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. 


➡ या मार्गावर धावणार बसेस

डोंबिवली-ठाणे

 पनवेल-दादर

पालघर-बोरिवली

विरार- बोरिवली

 टिटवाळा-ठाणे

आसनगाव- ठाणे

 कल्याण- ठाणे

 कल्याण –दादर

बदलापूर –ठाणे

नालासोपारा- बोरिवली 


अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाशी, ठाणे (खोपट) व दादर येथून शहरांतर्गत आपल्या कार्यालयात जाण्यासाठी ‘बेस्ट’ बसेसची सेवा एसटीच्या बसेसना पूरक अशा पद्धतीने जोडण्यात आली आहे, या सेवेचा संबंधित प्रवाशांनी लाभ घेण्याचे एसटी व बेस्ट प्रशासनाचे आवाहन

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात