ताजी बातमी

बांगलादेशातील मशिदीत ३ बॉम्बस्फोट करणाऱ्याला ठाण्यात ठोकल्या बेड्या

  बांगलादेशातील मशिदीत व बाहेर ३ बॉम्बस्फोट करणाºयाला ठाणे परिसरातील सिडको बस थांब्याजवळ बेड्या ठोकण्यात आल्या. सदर कारवाई गुन्हे शाखा घटक  १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने केली. बेकायदेशीरपणे बांगलादेशातून भारतात आल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयात हजर केले असता २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

     मोफाज्जल हुसेन उर्फ मोफा अली गाझी उर्फ मफीजुल केराअली मंडल (४२, रा. ग्राम कोटा, कोलारुआ, तहसील केरलकाता, जि. सातखीरा, बांगलादेश, सध्या रा. तुर्भे गाव, नवी मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. मोप्फाज्जल याने सन २००२ साली बांगलादेशातील खुलाण राज्यातील कोलारुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इलिसपूर गावातील मशिदीत १ व मशिदीबाहेर २ गावठी बॉम्बस्फोट घडवून आणले. या स्फोटात अनेक नागरिक जखमी झाले. बॉम्बस्फोट करताना एक गावठी बॉम्ब हातता प्फुटल्याने मोफाज्जल याचा उजवा हातदेखील तुटला होता. या स्प्फोटा प्रकरणी बांगलादेशातील न्यायालयाने मोफाज्जल हुसेन उर्फ मोफा अली गाझी उर्फ मफीजुल केराअली मंडल याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षा भोगत असताना सन २००४ साली वैद्यकीय कारणामुळे औषधोपचारासाठी न्यायालयाने जामिनावर मोफाज्जल याची सुटका केली. दरम्यान, जामिनाची मुदत संपल्यानंतर पुन्हा तुरुंगात हजर होण्याऐवजी मुप्फज्जाल याने भारतात पलायन केले. बेकायदेशीररीत्या पश्चिम बंगालमध्ये राहू लागला. तेथे बिगारी व मजुरी करू लागला. अधूनमधून तो नवी मुंबईत मजुरी करण्यासाठी यायचा. 

     बांगलादेशी मोप्फाज्जल याची माहिती खबºयाने ठाणे गुन्हे शाखा घटक - १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना दिली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे घटक १ च्या पथकाने ठाण्यातील सिडको बस थांब्याजवळ सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार मोफाज्जल हुसेन उर्फ मोफा अली गाझी उर्फ मफीजुल केराअली मंडल तेथे येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने बांगलादेशात बॉम्बस्प्फोट घडवून आणल्याची माहिती गुन्हे शाखा घटक १ च्या पोलिसांना दिली. कुठल्या प्रकारे व्हीसा अथवा पासपोर्ट नसताना भारतात राहिल्या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ९६/२०२०) पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० चे कलम ३(अ), ६(अ) सह परीकय नागरिकांचा कायदा १९४६ चे कलम १४-अ नुसार गुन्हा दाखल करून मोफाज्जल हुसेन उर्फ मोफा अली गाझी उर्फ मफीजुल केराअली मंडल याला अटक करण्यात आली.

     बांगलादेशात बॉम्बस्फोट करून भारतात पळून आलेल्या आरोपीला ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध - १)किसन गवळी, गुन्हे शाखा घटक १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, हवालदार (बक्कल नं. ५८४७) अबुतालीब शेख, हवालदार (बक्कल नं. ६२८५) संभाजी मोरे, पोलीस नाईक (बक्कल नं. १३२८) अजय साबळे, पोलीस नाईक (बक्कल नं. १६०२) दादा पाटील, पोलीस शिपाई (बक्कल नं. ७३१२) भगवान हिवरे आदी पथकाने अटक करण्यात मोलाची कामगिरी बजावली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात