ताजी बातमी

दिनांक १२/०३/२०२० रोजी सायंकाळी १८.३० वाजताचे सुमारास फर्निचर गल्ली, मल्हारराव कुलकर्णी रोड, बीईएसटी कॉलनी बोरीवली पश्चिम या ठिकाणी लक्ष्मण संतोष गाडे उर्फ विघ्नेश गाडे, वय 18 वर्षे, रा. साईबाबानगर एक्सर डोंगरी जॉगर्स पार्कजवळ बोरिवली पश्चिम मुंबई व त्याचे मित्र गप्पा मारत असताना आरोपी नामे अजय शिंदे २२  व बबलू सूर्यवंशी २० यांनी दोन दिवसांपूर्वी लक्ष्मण संतोष गाडे यांच्याबरोबर झालेल्या वादातून बबलू सूर्यवंशी याने त्याची हातातील काचेने लक्ष्मण संतोष गाडे  याच्या  मानेवर  भोसकले व अजय शिंदे याने हाताने पोटावर व छातीवर ठोसे मारले संतोष लक्ष्मण गाडे यास जखमी अवस्थेत त्यांचे मित्रांनी ऑटो रिक्षाने उपचाराकरिता सायली हॉस्पिटल, डॉन बास्को जवळ येथे घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी अॅम्ब्युलन्स मागवून संतोष लक्ष्मण गाडे उर्फ विघ्नेश गाडे यांना शताब्दी हॉस्पिटल येथे पाठविले. 

      शताब्दी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान रात्री १०.०० वाजता मयत घोषित केले.    

     फिर्यादी प्रमोद राघोराम शर्मा १९ वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरीवली पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १४१/२०२०, कलम ३०२, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 आरोपी अजय शिंदे व बबलू सूर्यवंशी यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात