ताजी बातमी

बनावट चावीने हिरे व्यावसायिकाच्या कार्यालयातून अडीच कोटी रुपयांचे हिरे चोरणार्या तिघांना व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केली. नरेश जयंतीभाई पटेल, तेजस दिनेश सरवैया आणि तरंग ऊर्फ रॉनी शरद पारीख अशी या तिघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 12 लाख रुपयांचे हिरे जप्त केले आहेत.

मलय मेहता यांच्या चर्नी रोड येथील कार्यालयात चोरी झाली. चोरीप्रकरणी  व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर केला. तपासादरम्यान पोलिसांनी नरेशला ताब्यात घेतले. नरेश हा हिरे विक्रीचे काम करायचा. तो अनेकदा मेहतांच्या कार्यालयात येत असायचा. चौकशीदरम्यान त्याने चोरीच्या गुह्याची कबुली दिली.न्यायालयाने त्या तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात