ताजी बातमी

नगर येथील संजयनगर झोपडपट्टीत राहणारी शुभांगी राजू भंडारे इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक वंचित फुटबॉल स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिचे वडील वडापाव विकतात, तर आई हॉटेलमध्ये स्कयंपाकी म्हणून काम करते. प्रतिकूल परिस्थितीतही दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड देत शुभांगीने हे यश मिळवले. मागील आठवड्यात शुभांगीची हिंदुस्थानच्या महिला फुटबॉल संघामध्ये होमलेस कर्ल्ड कप खेळण्यासाठी निवड झाली. येत्या 1 ते 20 जुलै या कालावधीत तिचे अंतिम प्रशिक्षण नागपूर येथे होणार आहे.

21 जुलैला हिंदुस्थानचा फुटबॉल संघ मुंबई येथून एडिनबरो, (स्कॉटलंड) साठी रवाना होणार आहे. इंग्लंडमधील कार्डिफ आणि केल्स या ठिकाणी दिनांक 27 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. स्नेहालय संस्थेतर्फे चालविण्यात येणार्या बालभवनची ती विद्यार्थीनी आहे. या यशाबद्दल तिचा स्नेहालयात सत्कार करण्यात आला. शुभांगी सध्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्टस् महाविद्यालयात कला शाखेत शिकते. तिचे वडील राजू नगरमधील बस स्थानकात वडापाव विकून चरितार्थ चालवतात.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात