ताजी बातमी

पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थी केतन जाधव याने नुकतेच जगातील उंच एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले आहे. केतनच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे

वाडा तालुक्यातील देवगाव येथील आश्रमशाळेतील केतन सीताराम जाधव या इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्याने जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर २३ मे रोजी पहाटे .१० वाजता पादाक्रांत केले. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेल्या 'मिशन शौर्य २०१९' या एव्हरेस्ट मोहिमेत केतन जाधव याच्यासह एकूण नऊ आदिवासी विद्यार्थ्यांची निवड झाली होती. विविध ठिकाणी घेतलेल्या खडतर प्रशिक्षणानंतर हा चमू एव्हरेस्ट पादाक्रांत करण्यासाठी गेला होता. २३ मे रोजी भल्या पहाटे या नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास घडवला आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात