ताजी बातमी

नाल्यात कचरा टाकला तर मुंबईकरांचा पाणी पुरवठा मुंबई महापालिका खंडीत करणार आहे. दरवर्षीच्या पावसापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून पालिकेकडून नालेसफाई केली जाते. मात्र याच नाल्यात रहिवाशांकडून कचरा टाकला जातो. यापुढे कचरा टाकताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कारवाईनंतरही कचरा टाकणे सुरुच राहिल्यास संबंधित विभागातील पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे. असे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत

नाल्याभोवती वसलेल्या झोपड्या, निवासी संकुलातून कचरा थेट नाल्यात टाकला जातो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने झोपडपट्टी, निवास संकुलातून वाहणाऱ्या नाल्याच्या कडेला 'जाळी' 'फ्लोटिंग ब्रूम' बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लोकांना नाल्यात कचरा टाकण्याबाबत जनप्रबोधनही करण्यात येणार आहे. वारंवार कचरा टाकला जात असल्यास प्रथम दंडात्मक कारवाई करावी, यासाठी मनुष्यबळाची नियुक्ती करावी, अशा सूचना देखील दिल्या आहेत

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात