ताजी बातमी

तारापूर येथील एका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील करिगो आँर्गेनिक्स या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाल्याने औद्योगिक वसाहतीच्या सुमारे 5 किलोमीटर परिसर हादरला. या स्फोटात चार कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट एन १५४ येथील करिगो आँर्गेनिक्स या रासायनिक कारखान्यात सोमवारी रात्री १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोटामध्ये काही कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत असून त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तारापुरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात