ताजी बातमी

अॅक्सिस बँकेत कामाला असलेल्या मितेश सुनील कांबळी (३२) याने सेवानिवृत्त झालेल्या अप्पा शंकर जगदाळे (६३) यांना विमा काढून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम उकळून त्यांची तब्बल ५२ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मितेश कांबळी विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे

तक्रारदार अप्पा शंकर जगदाळे हे सानपाडा सेक्टर- मधील साई प्रीत इमारतीत रहातात. ते २०१६मध्ये सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर जगदाळे यांना कंपनीकडून काही लाखांची रक्कम मिळणार होती. ती रक्कम त्यांना सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विम्यामध्ये गुंतवायची होती. त्यावेळी जगदाळे यांना सानपाडा सेक्टर-११ मधील अॅक्सिस बँकेत काम करणारा मितेश कांबळी हा विमा काढून देत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी २०१६मध्ये मितेशची भेट घेतली होती. त्यावेळी मितेश याने अॅक्सिस बँकेसोबत टायअप असलेल्या मॅक्स लाइफ इन्शुरन्सच्या चार विमा पॉलिसी जगदाळे यांना काढून दिल्या होत्या. यातील दोन जगदाळे यांच्या नावाने तर इतर दोन पॉलिसी त्यांची पत्नी आणि मुलगा या दोघांच्या नावावर होत्या. त्यानंतर मितेश हा प्रयेक वेळी जगदाळे यांच्याकडे पॉलिसीची रक्कम घेण्यासाठी येत होता. मात्र ही रक्कम तो जगदाळे यांच्या पॉलिसीसाठी वापरता तो स्वतः घेत होता

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात